गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४२९मनु राजा एक देहपुरी

वासुदेव - अभंग ६

४२९

मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी।

पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥

म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ।

दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥

सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।

कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥

पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती ।

स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥

केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ।

धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥

होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव ।

तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥

देह नावाच्या राज्यात मानुराजा राज्य करीत आहे. त्याला दोन राण्या आहेट. मुलाबाळांनी संपन्न आणि येश्वार्य्वान आहे. त्याने माझ्यावर कृपा केली आहे ॥१॥

म्हणूनच आम्ही या प्रदेशात आलो; नाहीतर दिशाभूल होऊन भलतीकडेच गेलो असतो. या देशात आल्यावर इछ्यादात्याची भेट झाली आणि तो मानुराज्या आमच्याबरोबर आला व त्याने आम्हालां मार्ग दाखविला ॥ध्रु.॥

आपले चार सर्वगुण संपन्न मुलगे बरोबर घेऊन तो आमच्या बरोबर आणले. मार्गातील अडथळे, खड्डे, काटे चुकून आम्हाला व्यवस्थित आपले. त्याच्याबरोबर आलेल्या मुलांची नावे ऐका ॥२॥

पुढे भक्ती चालत आहे. त्याच्या मागे ज्ञान, वैराग्य धर्म चालत आहेत. त्याच्यामुळे जे अचपळ होते, ते स्थिर झाले. सिद्ध लोकाना आणवून  त्यांना मार्गस्थ केले ॥३॥

आमच्या जन्मदात्या आई बापापेक्षा त्यांनी केलेले उपकार थोर आहेत. त्यांचे वर्णन काय करावे? त्यांच्या धर्मामुळे आम्हाला देवाचे पाय दिसले आणि अक्षय अभयदान मिळाले ॥४॥

तुकाराम महाराज म्हणतात, या आगोदर अनेक योनिंतून गावोगावी हिंडत होतो ; पण तेथे पोट भरले नाही. राहण्यास जागा मिळाली नाही. फार त्रास भोगला, शेवटी आता अमुराजाने कृपा केली व मार्ग दाखविला ॥५॥

1 टिप्पणी: