गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३६जग जोगी जग जोगी


जोगी - अभंग १
४३६

जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥

जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥

अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥

पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥

बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥

नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥

तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥

भावार्थ :-  जागे रहा जागे राहा असे म्हणत जगातील योगी, ज्ञानी पुरुष जगाला स्वकर्तव्याबद्दलचा उपदेश करीत आहेत. तो उपदेश असा ॥१॥

हे जग देव आहे. या वेद्वाक्यावर विश्वास ठेऊन जागे रहा ! ॥ध्रु.॥

सर्व क्षेत्रात पालन करणारा हा देव आहे. जीवमात्रांची देव समजून पूजा करा ॥२॥

पूजेसाठी पत्र, फुल, पाणी हे काहीही नसले तरी चालेल ॥३॥

अनेक वर्षांनी तुमच्या नगरात या योग्याचा फेरा आला आहे ॥४॥

अभिमान बाळगू नका. धर्म हेह जीवनाचे सार आहे, हे लक्षात घ्या ॥५॥

तुकाराम महाराज म्हणतात,  हा योगी तुमच्याकडे दान मागत आहे. त्याला अनन्य भावाने दान दया ! ॥५॥.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा