गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५७टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी

४५७

टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥

आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥

कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥

याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥
अर्थ :- ऐक संत सौरीस म्हणते, पैसा टाक. अशी प्रपंचात का गुतून राहिलीस ? भाजनानंदात माज्याबरोबर नाचायला चाल. आत्म्याचे स्वरूप कसे असते ते मी गुरूला विचारून जाणून घेतले आहे आणि म्हणूनच तुला शिव्या देत आहे ॥१॥

 

आपण या छंदात मनसोक्त नाचू. गोविंदाने माला माझे केले आहे. (आत्मस्वरूप दाखवीले आहे) ॥ध्रु.॥

 

अग, हे पोकळ शब्द का वाया घालवतेस ? तुझे मुल ठिकाण मिळवून दाखव आणि तेथे जाऊन रहा ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, देहाविशायाची अभिमानाची गाठ सोडवण्यासाठी तुम्ही काळजी घ्या, सावध असा, हे सांगण्यासाठी हा उपदेरुपी डमरू हातात घेतला आहे ॥३॥

1 टिप्पणी:

  1. The best online casinos in 2020
    Online gambling has exploded in popularity thanks to the rapid growth in the world's top online gambling operators. The boom in online gambling is expected to continue until 🎁 luckyclub Betway: Play Here!⭐Rating: 3.5 / 5.0🎁 Bet365: Trusted Review Rating: 3.5 · ‎Review by LeoVegas

    उत्तर द्याहटवा