शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

४६०सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं

४६०

सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥

चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥

हिंडोनि चौर्यांीशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥

लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥

जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥

तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥
अर्थ :- मी हातात डमरू घेऊन साऱ्या सौर्यांमध्ये शूर सौरी झालो आहे. हरिनामाच्या आनंदात नाचत आहे. माया, मोह दूर झाल्यामुळे मी तिन्ही लोकांत श्रेष्ठ झालो आहे  ॥१॥

 

हे विठाबाई, तू वाळवंटात सापडलीस. सर्वांचे देह पंचमहाभूतात्मक आहेत. त्या माझ्या पंचमहाभूतात्मक देहात चल. काही गुपित पाळगु नको ॥ध्रु.॥

 

चौर्यांशी लक्ष योनी फिरलो. आता विठाई, मी तुज्या दारी आले आहे. तुझ्या भक्ती-प्रेमायापी संसाराचा त्याग केला ॥२॥

 

लाज नाहीशी झाली आणि कोणाचीही भीती राहिली नाही. भ्रांतीचे वस्त्र फेडून टाकून मी महाद्वारी नाचत आहे. आता काय उरले आहे ? ॥३॥

 

मला सर्वानी टाकले. मी भांडखोर बनले आहे. माला आता कोणाचीही गरज नाही, कसलीच भीड नाही. मी तुझ्या चरणांना मिठी मारली आहे. तू आता माझ्या मनाची इछ्या पूर्ण कर ॥४॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, माला तुज्यामुळे नामरूपी रुका (पैसा) मिळाला आहे, म्हणजे आता संसार नाहीसा होईल. मग आता अशीतरी तुमची आमची गाठ घालू या ॥५॥

1 टिप्पणी: