गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५६आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण

४५६

आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥

तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥

बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥

तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥

अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश करतो, परंतु त्या प्रमाणे नाचण्याचे आपल्याला काळात नाही. त्यामुळे त्याचे मुंडण व्यर्थ जाते. लोक त्याला हसतात ॥१॥

 

इतराना उपदेश करू नकोस. इतर चाले करू नकोस. परस्त्री, परक्याचे धन यांचा लोभ ठेऊ नकोस. पूर्वी होऊन गेलेल्या संतरूपी सौर्यांचे कौशल्य घे आणि तसे नाचत जा ॥ध्रु.॥

 

बाहेरून सौरीचा वेश घेतला; परंतु अंत:करणात काम, क्रोध बाळगले तर त्याचा काय उपयोग ? तुमचे अंतरंग जोवर झाकले आहे, तोवर ठीक आहे. ते उघडकीस आले कि लोह हसतील. अश्या बाह्य वेषाने  फार तर तुमचे पोट भरेल, पण तुम्हाला कृतार्थ होऊ शकत नाही ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, ठेवायचा असेल तर पांडुरंग चरणी शुद्ध भाव ठेवा; नाहीतर दांभिकपणामुळे देव नाही व संसारही नाही, अशी गत होईल ॥३॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा