गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५०आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक

कावडे - अभंग ५

४५०

आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ।

ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥१॥

माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।

पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥

जें या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जें पातळ ।

प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥३॥

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥

काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव ।

शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥५॥

पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ।

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया ॥६॥

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा ।

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।

पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी ।

पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥

अर्थ :- भाइंनो, प्रथम गणरायाला नमन करू. श्री गुरुचारानावर मस्तक ठेऊ. त्यांच्या कृपा प्रसादाने मुखातून प्रासादिक वाणी बाहेर पडेल. हरिहरांचे पोवाडे गाउ ॥१॥

 

असे सेवाकत्व करण्यासाठी माझी ब्रीदावळी प्रसिद्ध आहे. मी पूर्वपरंपरेच्या मार्गावरून जात आहे. ते नामाजीवन साधकाने प्राशन करावे ॥ध्रु.॥

 

साधकहो, ते नाम शितालाहून शीतल, पातळापेक्षा पातळ, रसपूर्वक असे प्रेमामृत आहे. त्याचे सेवन करा ॥२॥

 

जिंकायचे असेल तर अभिमान जिंका, दवाडायाचे तर मान, लज्जा दवडा. अंत:करणात शांभूमाहादेवाचे ध्यान करा. दाखवायचा असेल तर निश्चय असा दाखवा ॥३॥

 

भविष्यात निवांतपणे परमार्थाचा मार्ग अवलंबू, असे म्हणाल तर तो काल तुम्हाला थाबु देणार नाही. निंदा-नालस्तीचे जे काही घाव तुमच्यावर बसतील ते सारे सहन करा. विठ्ठल चरणावर शुद्ध भाव ठेवा. मुखाने ‘हरहर महादेव’ अशी गर्जना करा ॥४॥

 

परस्त्री मातेसमान मानून, परद्राव्यहि त्याज्य माना. स्वामींची सेवा करतांना आपला जीव तृनवत मानून जो खर्च करतो, त्यालाच शूर वीर मानावे ॥५॥

 

शरीरातील बळ परोपकारासाठी खर्च करावे. प्रपंच्याचा हा पसारा खोटा आहे हे लक्षात घ्या. भावनादीतून तरुण जाणे हे सत्य आहे. येथे आला आहात, तेव्हा त्याचा कंटाळा करू नका, असे मी सांगत आहे ॥६॥

 

एकादशी सोमवार व्रत करा. कथा, पूजन, हरिजागरण करा. देवाचे नाव घेण्याने,

नामछंदात नाचान्याने मोठे पुण्य मिळते. त्यांना पुन्हा जन्मास येऊन संसारात पडावे लागत नाही, हे मी सत्य सांगत आहे ॥७॥

 

संतसंगत करणे चांगले, असे करणार्याना उत्तम कीर्ती प्राप्त होते. वासनेचे लिगाड सोडून सुपंथ चालवा ॥८॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, प्रवृत्ती-निवृत्तीची शुद्ध कावड मी चालविली आहे. आवडीने भजनाचे कलश भरून घेतले आहेत. त्यात पुध्ये अधिकाधिक रुची झाली आहे. केशवदास म्हणून मी नटत आहे ॥९॥

1 टिप्पणी: