गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४४अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे

वैद्यगोळी - अभंग १

४४४

अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥

मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥

सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥

जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥३॥

सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥

मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥

बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥६॥

अर्थ :- जगात देणारा व देवाविनारा देवच आहे. औषध देणाराही देवच आहे. देवाशिवाय दुसरे कोणीही नाही. जे देव करील, तेच होईल ॥१॥

 

जो मर्द आहे, तो औषध घेईल व जो भित्र आहे, त्याला धीर धरवणार नाही. हे औषध प्रश्न करून आपले मन प्रसन्न करावे. तीन दमडीची किंमत ती काय ! ॥ध्रु.॥

 

सार्या संसाराचे सार म्हणजे भगवंत भजनाची गोळी आहे तो सर्वाचा पालनकर्ता आहे, या विश्वासाने गोळी घ्या ॥२॥

 

ज्यांच्याजवळ धर्मनीती झोपी गेल्या आहेत ते पुरे-बास म्हणून रडतात. सप्तधातूयुक्त, पंचमभूतात्मक अशा या शरीरावर मात करू शकणार्या या भजनगोळीमुने ज्यांच्या भावारोगाला उतार पडला आहे, ते ती गोळी नेहमी घेतात ॥३॥

 

हे गाढवा, तारुण्याचा भर ओसरला कि मातीच खावी लागते. जे खेडवळ, मुर्ख आहेत, ते काय माझी हि भजनगोळी घेऊ शकतील ? कारण त्यांचे घाणेरडे ढुंगण त्यांच्याकडून धुतले जाईना, घाण अंग दुन्याची त्यांची बुद्धी नाही ॥४॥

 

ज्यांनी माझी भजन गोळी घेतली, त्यांना आत्मपद प्राप्त होते. खाली मुंडी घालून चालणारा हमाल ती काय घेणार ? ॥५॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला वस्तूची किंमत कळते, ते माझी भजन गोळी घेण्यासाठी पत्ता विचारीत येतील. त्यांना मी ती फुकट देईन. जे सत्प्रवृत्त असतील तेच ती गोळी घेतील ॥६॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा