गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३८संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट

४३८

संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥

प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ध्रु.॥

उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥२॥

कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥

भावार्थ :-  मित्रा, सांभाळून रहा. (स्वर्गाच्या) वरच्या गती आणि (पशूच्या) खालच्या गती म्हणजे यमपुरी आणि पशुयोनी होत. दोन माराचे तडाके सोसण्यात जो दक्ष आहे.

४३९

सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥

आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥

आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥२॥

जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥३॥

निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥४॥

कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥५॥

अर्थ :- अर्थ :- हे मुला, तू स्वताचे रक्षण कर. विषयाच्या ठिकाणी गुंग झालास आणि ताठ उभा राहिलास ? मोहरूपी मदिरेमुळे उन्मत झाला आहेस. तुला माझा विसर पडला आहे ॥१॥

 

अरे मुर्खा, स्वताला सामभाळ रे बाबा ! स्वताला सांभाळ. सावधगिरी बाळग. माझ्याशी न बोलशील तर तुझे हाल होईल रे! ॥२॥

 

गाढवा, हा देह पुन्हा मिळणार नाही. या मुद्दलाला तू विसरला आहेस. जम्मृत्युच्या चक्रात गोते खात राहताना तुला लाज कशी वाटत नाही ? ॥३॥

 

तू ज्याच्या साठी तडफड करीत आहेस ते तुला शेवटी उपयोगी पडणार नाहीत. हातात भोपाळा घेऊन तू गोसावी झालास तरी ते योग्य नव्हे ! ॥४॥

 

मुर्खा, अरे, तुझी बायका-पोरे तुला सोडून जातील; म्हणून त्यांची आसक्ती बाळगून मुर्खपणा करू नकोस. तारुण्यातील बळ-शक्ती यांची बाब विसरून जा, म्हणजे चित्त स्थिर होईल ॥५॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा