गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४६सुदिन सुवेळ

४४६

सुदिन सुवेळ । तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥

पंढरपुरनिवासे । तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा । मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥

मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥

बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती । कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥३॥

स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता । विठाबाई पंचभूतीं वो ॥४॥

तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥५॥

अर्थ :- चांगला दिवस, चांगला मुहूर्त असलेल्या या वेळेला हे विठाई माउली, मी तुझा गोंधळ मांडला आहे. प्रपंच्याच्या दिवटी आणि दोन्ही डोळ्यांचे हिलाळ पेटविले आहेत ॥१॥

 

हे पंढरीवासिनी, मी तुज्या रंगात अंगणात नाचत आहे. माझ्या मनाची इछ्या जाणून माझा नवस पूर्ण कर ॥ध्रु.॥

 

तुज्या विशावारुपाचा देव्हारा त्रीलोक्यात मानला आहे. चित्ताचा चौक साधला असून मध्ये अंत:करनाचा कळस मांडला आहे ॥२॥

 

ज्या देवतेच्या गाळ्यात तुळशी माळा आहेत,  ज्या देवतेच्या समोर वैष्णव गाणी गात आहेत, हरिनामाचा जयघोष करीत, ती देवता नाभिकळसावर बसैली आहे ॥३॥

 

स्वानंदाच्या ताटात भक्तीरासाचा नैव्यद्य वाढून, अहंकाराचा धूप जाळून, त्या वैष्णवांनी चीतान्याचा दीप लावला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आई, विठाईमाते, देहापासून अहंकारापर्यंत जे जे तुझे पदार्थ माझ्याजवळ होते, ते सारे तुला अर्पण केले आहेत. आता माझा नवस पुरव. शरणागताचे साधकाचे रक्षण कर ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा