गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४८शंख करिशी ज्याच्या नांवें

४४८

शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें ।

ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें । रे विठ्ठल ॥१॥

टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग ।

पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥२॥

राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी ।

वासने हातीं बांधवी नळी । त्यासि येउनि गाळी । रे विठ्ठल ॥३॥

कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ।

करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख । रे विठ्ठल ॥४॥

सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां ।

विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका । रे विठ्ठल ॥५॥

कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी ।

फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळे । रे विठ्ठल ॥६॥

फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया ।

शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया । रे विठ्ठल ॥७॥

धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका ।

आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका । रे विठ्ठल ॥८॥

बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें ।

पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें । रे विठ्ठल ॥९॥

काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका ।

चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका । रे विठ्ठल ॥१०॥

अर्थ :- ज्याच्या नावे शंख करतोस, त्या विठ्ठलाचे तुला काहीही ठाऊक नाही. मी तुला जे सांगतो ते येकांनीश्ठेने ऐक. तुझ्या नशिबामुळे जे अन्न तुला मिळाले ते इतरांना देऊन मग खा  ॥१॥

 

टिळे लाऊन, माळा घालून, तुळशी, रुद्राक्ष कंठी धारण करून, देवाचा सांभाळ हातात घेतोस आणि मुक्तपानाचे सोंग घेऊन जगाला फासावितोस; कारण तुज्याजवळ खरी त्याग भावना नाही. तू कोणापुढेही हात पसरवातोस. लोकाना दगडाची पूजा करायला लावतोस ॥ध्रु.॥

 

अंगाला राखा फासातोस आणि ‘सामर्थ्यसंपन्न पुरुष म्हणून सगळीकडे मिरवतोस. वासनेच्या हाताने मान बांधून घेतोस, मात्र तुज्याजवळ येऊन काळ तुला गिळून टाकील आणि तुझे मरण ओढवेल. गिळलेले जेव्हा काळ ओकून टाकतो तेव्हा जन्म प्राप्त होतो हे तुला समाजात नाही ॥२॥

 

वर पाय व खाली तोंड असे घाणीत राहण्याचे कसले आले आहे सुख ? ते पीडा करविते, दुख भोगाविते. नरकात जाशील तरी तू त्याचा त्याग करीत नाहीस ॥३॥

 

अश्लील उखाणे शिखवातोस आणि ओरडून स्त्रिया, पोरांसह माणसे गोळा करतोस. अनेक सोंग घेऊन शरीर बिहात्व करतोस व लोकांपुढे हात पसरवातोस ॥४॥

 

मी कोणीतरी खूप मोठा सामर्थवान आहे, असे दाखविण्यासाठी उभा राहून फळी मंडतोस. कोपर, गुढघे फोडून घेतोस व ते परत चोळत बसतोस. स्वत:च स्वत:चा घात करून घेतोस आणि नंतर तळमळत बसतोस. अरे, विठ्ठला भर रे ! ॥५॥

 

सोंग घेऊन डोके बडवून घ्यायचे अशा व्यर्थ खेळामुळे कित्येक जन फसले. सन्यासी, बैरागी, गोसावी असे लोक अनेक प्रकारचे वेश घेतात व डोक्याचे मुंडण करतात; परंतु जिला स्पर्श करू नये, अशी माया आपल्या अंतकरणात वागवीत. वेशानुसार शरीर नसते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या देहाला विटंबना करून घेतली आहे ॥६॥

 

त्यामुळे अश्या धूळ मातीच्या संसारात तुम्ही खेळू नाका. चंदन, कस्तुरी,बुक्का याच्यासारखा असलेला परमार्थ, त्या खऱ्या परमार्थाचे ग्रहण करा. त्यामुळे आपल्याला आनंद सुगंधाचा लाभा होईल. धुलामातीत फजिती होते ॥७॥

 

असल्या खेळामुळे अनेक लोक दुखी झाले. अंगात बळ, डोक्यात बुद्धी राहिली नाही. पाठीवर कोरडे बसले आणि तोंड काळे झाले. हे सारे रसना द्रव्याच्या उपस्तीतीमुळे झाले. अरे, विठ्ठलाला भाज रे ! ॥८॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, मी काय म्हणतो, ते एका. हा खेळ मोडून टाका. भलते सलते काही करू नका. भूक लागली आहे तर आधी वित्थालाबरोबर जेऊ. जेवून तृप्त झाल्यावर मग हा तुमचा नखरा (डौल) शोभून दिसेल ॥९॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा