गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४९ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन

४४९

ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥

मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥

सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥२॥

बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥३॥

आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साहए चहूं अठरांच्या बळें ॥४॥

करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥

कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥६॥

तुका म्हणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥७॥

अर्थ :- हात पाहुनी शकुन सांगणारी कैकई म्हणते, हे बाई, मी तुला शकुन सांगते, ऐका ! हरीकाथेत तू जर झोपलीस तर तुझी अधोगती होईल. तू नरकात जाशील. म्हणून जागीच रहा ॥१॥

 

मी तुला आज जे सांगत आहे, ते साधुसंतानीही मान्य केले आहे; परंतु व्यवहारचतुर माणसांना या गोष्टी काळात नाहीत ॥ध्रु.॥

 

तुझे आणखी भविश्य  सांगते ते ऐक, तुझा हात माझ्या हातात दे ॥२॥

 

अग, तुझ्या हस्तरेश्यांवरून असे दिसते आहे, कि तुला घरदार, पती, वैभव प्राप्त झाले आहे. मात्र अदयाप तुला  (बोधप्रप्ती) पुत्र प्राप्ती झाली नाही ॥३॥

 

तुझ्या हातात ऐक नवसाचे फल आहे म्हणून चार वेद, अठरा पुराने यांची मदत घुवून तू भाक्तीभावाला मदत कर ॥४॥

 

गुरुंचा पाठलाग कर. चित्त, वित्त यांच्याकडे पाहू नकोस. गुरूने तुला स्वीकार केले तर तुझे सौभाग्य अखंड राहील. आत्मरूपी पती तुला सुखभोग देईल ॥५॥

 

तुज्या अंगात पंढरीची देवी आहे. ती तुज्या पाठीमागे लागली आहे. तुला तिचा विसर पडला आहे, तिला तू जाणत नाहीस, म्हणून ती तुला फल देत नाही ॥६॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, तू तुझ्या घरी सुखाने रहा. भगवंताची आठवण ठेव. घरी जे कोणी भक्त येतील त्यांचा चांगला मन ठेव ॥७॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा