गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४३२राम राम दोनी अक्षरें

४३२

राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥

राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागर्यावघोषें गा ॥ध्रु.॥

गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥

एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं । नीज घेउनि फिरती गा ॥३॥

सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥

शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥

भावार्थ :- राम-राम ही दोन अक्षरे सहज, सोपी आहेत. त्यांचा उच्चार करून शेवटच्या या प्रहरात तुम्ही जागे रहा. शेवट गोड तर सारे गोड असेल  ॥१॥

अगोदर जर एखादा माणूस दुराचारी असेला, परंतु म्हातारपणी जर त्याने भजन केले व ते अखेर पर्यंत टिकविले, तर त्याचा शेवट गोड झाला, असे मानावे ॥ध्रु.॥

वसुदेव वासुदेवाचे स्मरण करून गात आहे. त्यात द्वैत नाही, हे जाणून देत आहे. मनात दान करण्यासाठी काहीही आड ठेऊ नका ॥२॥

वासुदेव आपले मूळ  आत्मस्वरूप घेऊन दररोज फिरत आहे. उपदेश करीत आहे. प्रपंचातील कामे,  प्रपंचाचा भार टाकून दया आणि वासुदेवाला पानात पक्के धरा ॥३॥

कृपाळू असे संतजन ‘मी सर्वत्र आहे’ मी सर्वर आहे असा भाव जाणतात. त्यांच्या ठिकाणी भिन्नत्वाचा, भेदाचा ठाव नसतो ॥४॥ ज्याना वासुदेवाचा विसर पडत नाही, ते ज्ञानदाते शूर व उदार आहेत. चराचरांत त्यांची किर्ती पसरलेली आहे. त्यांना माझा नमस्कार असो, असे  तुकाराम महाराज म्हणतात,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा