गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४५राजस सुंदर बाळा

गोंधळ - अभंग ३

४४५

राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली ।

माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी । परब्रम्ह वेल्हाळा वो ॥१॥

राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥

सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा ।

उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥२॥

निर्गुण निराकार । वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले ।

श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥३॥

येउनि पंढरपुरा । अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव ।

वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥४॥

अर्थ :- विटेवर उभ्या असलेल्या राजस, सुकुमार, सुंदर बाळाला पाहण्यासाठी सर्व भाक्तीरूपी स्त्रिया जमल्या आहेत. परब्रह्मरूपी माझी विठाई प्रत्येकाच्या ह्रदयात प्रतिबिंबित होऊन राहिली आहे. तिच्या अंगी असलेल्या लीला कोटी चंद्रासुर्यासारख्या आहेत ॥१॥

 

हे राजास विठाबाई, माझे मन त्य्ज्या चरणी लागो ॥ध्रु.॥

तू सुकुमार, सुंदर आहेस. तुझी पाउले कशी गोजिरे आहेत ! कंठात तुळशीच्या माला घालून तू भीवरेच्या तीरावर उभा आहेस. तुझे दात म्हणजे हित्याच्या जोती आहेत. तुज्या हातात शंख, चक्र शोभत आहेत ॥२॥

 

तू निर्गुण-निराकार आहेस. तुझा आकार वेदांनाही कळालेला नाही. शेष आणि वरून तुझे वर्णन करतांना दमून गेले. श्रुतींना तुझा पार लागू शकला नाही. आपले भाऊ उभारून तू भक्तांना भिऊ नकोस असे सांगत आहेस ॥३॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, हि सारांग्धरादेवी पंढरीत प्रकट झाली आहे. भक्तीभाव पाहून अमृतधाराची वृष्टी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या दासांना प्रेमपान्हा पाजून तृप्त करीत आहे ॥४॥

1 टिप्पणी: