गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४४३अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज

४४३

अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥

ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥

जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥

अर्थ :- अल्लाने (देवाने) केले तर सर्वसामान्य माणूसही शिरावरील मुकुट होईल; नाहीतर मुकुटाचेही सामान्य वस्तुत रुपांतर होईल. देवाची कृपा असेल तर गाई-वासारेही वाघाशी मैत्री करून, त्याच्या सोबत चालतील ॥१॥

 

बाबा, माझ्या साहेबाचा विचार करणारे, त्यांचे चिंतन करणारे पुढे गेले. आपल्या पदी विराजमान झाले  ॥२॥

 

बाबांनो, सर्वांमध्ये वास्तव करणार्या सर्वव्यापी अल्लाचे चिंतन करा. हे ज्याला कळते, तोच संत होय ॥३॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा