शनिवार, २२ एप्रिल, २०१७

४६९वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात

शेजारातीचे अभंग

गाथा अभंग ४६९

वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥

कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥

डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥

सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥

तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥
 

अर्थ :- मस्तकाला हाथ लाऊन मी विठ्ठलाची वाट पाहत आहे. माझी नजर आमी मन पूर्णपणे पंढरीच्या वाटेला लागले आहे ॥१॥

 

माझा मायबाप माझ्याकडे  येत असलेला कधी एकदा पाहतो, असे मला झाले आहे. दिवस, घटका चालल्या आहेत. मी बोटावर त्याची मोजणी करीत आहे ॥ध्रु.॥

 

दावा डोळा लावतो आहे, उजवा बाहू स्पुरून पाहतो आहे. देहभाव विसरून माझे मन उतावीळ झाले आहे ॥२॥

 

सुखाच्या अंथरुणावर अंग टाकले असता मन सुखावतनाही. घरदार नकोसे वाटत आहे. तहान-भूक हरपली आहे ॥३॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, माला नेण्यासाठी पंढरीच्या वाटेवरून येणारे मूळ माझे आई बाप (विठ्ठल) कधी पाहीन? असा धान्य दिवस कधी उगवेल ? ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा