शनिवार, २२ एप्रिल, २०१७

४६५जन्मा आलिया गेलिया परी

४६५

जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ।

माझें माझें म्हणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥

येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका ।

नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥

खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । म्हणती आम्ही बर्याे । साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्या ॥३॥

वाचोनि पढोनि जाले शाहणे । म्हणती आम्ही संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥४॥

टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥५॥

कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥

संत म्हणती केली निंदा । निंदा नव्हे भाई । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥७॥

अर्थ :- फिरून फिरून मनुष्यधर्म लाभला: पण एकाही जन्मात तुझी भक्ती नाही केली, चांगला गुरु केला नाही. त्यामुळे परमेश्वर प्राप्तीचा योग्य मार्ग सापडला नाही. उलट हे माझे, ते माझे अशा हव्यासात जीवन कधी संपले, ते कळालेच नाही. जेऊन-खाऊन, वस्त्रलांकार घालून सुगृहीनिप्रमाने बसलेल्या, पण साधू-संत आल्यावर निघून जाणार्या वेश्याप्रमाने किवा मनामध्ये दयाधर्म नसनार्या, पण वाराकार्याचा वेश घालणार्या भोन्दुप्रमाने यांची स्तीती झाली आहे. असे भोंदू संत येऊन दारोदार फिरतात; पण जे अंतर्बाह्य संत-सज्जन आहेत, त्यांना मात्र मी अनन्यभावाने शरण जातो ॥१ते७॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा