शनिवार, २२ एप्रिल, २०१७

४६६अनंत जुगाचा देव्हारा

वाघा - अभंग १

४६६

अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥

शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तिच्या ॥२॥

हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥

लक्ष चौर्यां शी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥

या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥

अर्थ :- वाघ्या म्हणतो, आपले मन म्हणेजे युगा युगांचे देव्हारे असून त्यात आत्मज्ञानाचा संचार झाला आहे आणि मल्हारी देवाचे वारे अवचितपणे या देव्हाऱ्यात शिरत आहे ॥१॥

 

शुद्ध सात्विक तत्वाची कवड्याची माळ घालून, गाठीला बोधाचे, ज्ञानाचे बिरडे बांधून, गळ्यात वैराग्याचा पट्टा बांधन भक्तीच्या संपूर्ण वाटा जगाला दाखून देऊ ॥ध्रु.॥

 

लाकडी भिक्षापात्र म्हणजे मन किंवा ह्र्दय असून अनुहाताच्या संगतीने घोळ वाजवून, आमच्या जवळचे ज्ञान भांदार्यासारखे पोत्यात उधळले तरी ते शेवट पर्यंत पूर्ण रिकामे होत नाही ॥२॥

 

या संपूर्ण आयुशातच लक्ष चुर्यांऐशीची वारी पूर्ण केल्यानंतर मल्हारी देव प्रसन्न झाला आहे ॥३॥

 

अहंकार फक्त राहिला. या देवाचे भक्तीचे वारे अंगात भरले, देवाच्या भक्तीच्या लाटा अंगात भरल्या कि प्रेमाचे उमाळे आपोआप येतात. आनंदून मन वेडेपिसे होते ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा