शनिवार, २२ एप्रिल, २०१७

463

४६३

नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥

ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ध्रु.॥

चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥२॥

थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥३॥

आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥४॥

अर्थ :- चांगला थाट माट करून, नटून-सजून आपल्याकडे कुणीतरी पाहिलं, असे म्हणत बाजारात निघाली ॥१॥

 

ती चांगली स्वैरिन नव्हे. भक्त नसलेली ती फिकि आहे ॥ध्रु.॥

 

वरवर चांगुल पानाचे सोंग करते. माला, मुद्रा धारण करते. पैशाच्या आशेने माना हालविते ॥२॥

 

प्रतीष्टीतांच्या घरी फेर्या मारते. नाचते. जेथे पैसा मिळतो, त्याच्यापुढे नितंब हलविते ॥३॥

 

बाहेरून चांगली, पण आतून दृष्ट अशी स्त्री म्हणजे सौरी नसून ती दुधारी तलवार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी भक्तिप्रेमात बुडालो आहे. माझा संग करू नकोस ॥४॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा