४६४
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥
घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥
दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी ।
तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥
अर्थ :- घर-दार केलेत, पण खायला वारीचा दाणाही नसेल; तसेच दुकान थातालेत; पण त्यात माल भरण्यासाठी पैसा खोटा असेल, तर उपयोग काय ? त्याप्रमाणे आपल्याबरोबर जर अविद्या, अज्ञान नांदत असेल, तर शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध यांच्याच मोहजालात आपण अडकू राहू आमी सुखोपभोगाच्या आसक्तीपायी भाग-वंतापासून दूर जाऊ. हे सर्व टाळायचे असेल तर हरिनामाची कास धरा, असे तुकोबा म्हणतात ॥१ते५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा