शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

मंगलाचन अभंग 1


संचरणदृष्टी विटेवरी साजिरि । तेथे माजी हरी रुत्ति राहो ।।1।।

आणिक नलगे मायिक पदार्थ । तेथे माजे आर्त नाको देवा ।।2।।

ब्रम्हादिक पदे दुःखाची शीरानी । तिथे चित्त झनि जड़ो देवा।।3।।

तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशिवंत ।।4।।

अर्थ :- ज्याचे चरण जुळलेले असून ते विटेवर आहे. दृष्टी सरळ-सुशोभित अशी आहे. हेब हरी, तेथे माजी रुत्ति सतत राहो ।।1।।

हे ईश्वरा, मायने भरलेले अन्य कोंतेच पदार्थ मला आवडत नाहीत. अश्या ठिकाणी माझी रुत्ती कधीच जाउ देऊ नकोस।।2।।

ब्रम्हादि पदासारखि सारि पदे उपभोगाची आणि दुःखकारक आहेत, हे जाणुनही त्या वस्तुंकडे माझे ध्यान आकर्षिले जाईल; परंतु तू तसे होउ देऊ
नकोस ।।3।।

 जी कर्म व धर्म आहेत, ते सर्व नाशवंत आहे, हे सत्य आम्हाला कळालेले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात।।4।।
 ।।राम कृष्ण हरी।।

२ टिप्पण्या: