रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१३८याल तर या रे लागें

काला अभंग १३८

याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥

आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥

हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥

तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥

अर्थ :- तुम्ह सवंगड्यांना यायच असेल तर माझ्या मगोमाग या ।।1।।

तुम्ही 'पुरे' म्हणोपर्यंत मई तुम्हाला पोटभर जेवण देतो ।।ध्रु।।

मात्र मझ्याबरोबर हळूहळू चला, एकमेकांशी बोलू नका ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, संसाररूपी कच्या कन्या टाकून दया. त्यांनी पोट भरू नका ।।3।।.

1 टिप्पणी:

  1. बाळकृष्णच्या लीला संतांनी उत्कृष्ट शब्दात मांडले आहेत. त्यापैकी हा एक उत्तम अभंग.

    उत्तर द्याहटवा