रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१४८अनंत ब्रम्हांडे उदरीं

१४८

अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥

नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥

पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥

विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥

तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥

अर्थ :- अनंत ब्रम्हांडनचा जाने उधार केला आहे, जो अनंत ब्रम्हांदांचा हरी आहे. असा हा श्रीकृष्ण नंदाघरि बालरूप घेऊन खेळतो आहे ।।1।।

या बालहारीचे मोठे नवल आहे, याचे कोढे काही केल्या सुटत नाही ।।ध्रु।।

जो सर्व पृथ्वीला तृप्त करो.   त्याला सगुन रुपात , गोकुलात यशोदा भोजन देते ।।2।।

हां कमलापति सर्व विश्वाला व्यापूण राहिला आहे; परंतु गौळणी याल सगुन रुपात आपल्या कडेवर घेतात ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, हा मोठा नतधारि आहे. गोपिणसंगे सर्व सुख भोग भोगनही आपण ब्रम्हचारी राहिला आहे, हे केवधे आच्छर्य आहे ! ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा