शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५
८३जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय
शनिवार, १ ऑगस्ट, २०१५
गाथा अभंग ११
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥
अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥
गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥
अर्थ :- त्यांची चरणवंदना करुण, त्यांचे उष्टे सेवन करू; त्यामुळे आपल्या पूर्व कर्मचि होळी होईल ।।1।।
हे ज्ञानभक्तिचे भांडवल पदरी बांधून, विठ्ठलास वश करुण घेऊ ।।ध्रु।।
गोविंदाचे केवळ नामस्मरणान व् चिंतनाने जीवनातील सर्व लाभ प्राप्त होतील ।।2।।
जन्ममृत्युच्या एरझारया संपतील आणि संत सहवासाने हां जन्म सार्थकी लागेल ।।3।।
पुढे गेलेल्या संतसजनांच्या मार्गाने शोध करीत त्यांच्या मार्गाने आपण त्यांचा माग घेत पुढे जाऊ ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात की, या मार्गाने गेलो असता मोक्षरुपी माहेराचा लाभ होईल ।।5।।
गाथा अभंग१०
गाथा अभंग १०
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥२॥
तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥
अर्थ :- परमेश्वर भक्ताच्या अतःकरणातील भक्तिचि गोडी स्विकारतो आणि त्याच्या अतःकरणातील भाव पाहतो ।।1।।
देव भक्ताचा सोयरा झालेला असतो ।।ध्रु।।
भक्ताच्या अंतरंगामधे तोच भक्तीचे वैभव निर्माण करतो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात की, तो भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्ष्याव करतो ।।3।।
गाथा अभंग ०९
अभंग ०९
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
अर्थ :-- ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते. त्याचे माय बाप धन्य होतात ।।1।।
ज्या कुळामधे सात्विक रुत्तिचि मुले-मूली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल आदर वाटतो ।।ध्रु।।
अशी सात्विक रुत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे चिंतन करतात ।।2।।
अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल, असे तुकोबा या अभंगात म्हणतात ।।3।।
मंगलाचनार अभंग ४
मंगलाचरण अभंग ४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
अर्थ:- राजस, सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतुळा आहे. सूर्य-चंद्राच्या प्रभा त्याच्या तेजयात लपल्या आहे ।।1।।
त्याच्या कपाळि कस्तूरिचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची ऊटी लावलेली आहे. गळ्यात वैजयंतीमाळा रूळत आहे ।।ध्रु।।
मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुन्दर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे ।।2।।
त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व् भरजरि शेला पांघरला आहे. बायानो असा हा विठुराया सवल्या रंगाचा आहे ।।3।।
तुम्हीही सर्वांनी हे रूप मनात जपुन ठेवावे. ऎसे श्रीमुख पहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही ।।4।।