सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३२४तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें

गाथा अभंग ३२४

तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥

रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥

नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥

तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥

अर्थ :- माझ्या भक्तिभावामुळे तुझे रूप, रहस्य मला सापडले आहे ।।1।।

कासव जैसे आपले आवयव पोटाशी आवळून घेतो, तसे तुझे रूप मी वृदयाशि धरले आहे ।।ध्रु।।

या आपल्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होणार नाही. तुझ्या दृष्टिशी माझी दृष्टी एकरूप होईल ।।2।।

तुकोबा म्हणतात, आता यापुढे तझे चिंतन आणि सेवा हेच माझे जीवन, हेच सत्य आहे ।।3।।

३२२कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा

गाथा अभंग ३२२

कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥

तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥

पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥

तुका म्हणे देवा । माझा करावा कुठावा ॥३॥

अर्थ :- हे देवा, तुमची माझी जन्मा आधिपासूनचि ओळख आहे; ती तुम्ही सहजपणे विसराल ।।1।।

तर तुमच्या इनामाला बट्टा लागेल आणि माझेही नुकसान होईल ।।ध्रु।।

एखाद्याजवळ विश्वासाने संभाळन्यास दिलेला ठेवा त्याने अभिलाशेने बुडवावा, त्या प्रमाणे तुमचे वर्तन ठरेल ।।2।।

हे दातारा, माझी ओळख विसरु नका, असे तुकोबा म्हणतात ।।3।।

३२१दाता नारायण । स्वयें भोगिता आपण

गाथा अभंग ३२१

दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥

आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥

देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥

तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥३॥

अर्थ :- मनुष्याला सर्व सुख देणारा नारायन आहे आणि उपभोगनाराहि तोच आहे ।।1।।

त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागाच् राहिली नाही ।।ध्रु।।

आपले डोळे, त्या डोळ्यांना दिसनारे रूप सर्व काही तोच आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, मुखातून निघनारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान, शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे ।।3।।

३२०बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों

गाथा अभंग ३२०

बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥

भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥

विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥

सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥

गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥

तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥

अर्थ :- बारे झाले देवा, तू मला कुनबी मातीत जन्माला घातलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या गर्वाने मेलो असतो ।।1।।

थोर केले नाहीस हे बारे झाले, आता मी तुझ्या पायाशि नाचू शकतो ।।ध्रु।।

माझ्याजवाल कोणतीही विद्या असती तर माला अहंकार झाला असता ।।2।।

तय अहंकारामुळे माझ्या हातून संतासेवा घडली नसती आणि हां नरदेह वाया गेला असता ।।3।।

त्या विध्येच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व, ताठा आला असता; त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालु लागलो असतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, थोरापनामुळे अभिमान, अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य अंती नरकात जातो ।।5।।

#रामकृष्णहरि_विठ्ठल_केशवा

३१९बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि

गाथा अभंग ३१९

बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥

काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥

दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥

तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥

अर्थ :- बोलताना दोळसपनाने, धर्मसंकेतानुसार बोलावे ।।1।।

बोलू नये ते जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील ।।ध्रु।।

आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढ़ाया मारतो ।।3।।

३१८उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड

गाथा अभंग ३१८

उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥

बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥

तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥

तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥

अर्थ :- मी प्रपंच्याकडून परमारथाकडे जाणारी वाट उजळविन्यासाठी व सत्य-असत्य संगन्यासाठी आलो आहे ।।1।।

माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे. तो जसे बोलवितो, तसे मी बोलतो ।।ध्रु।।

त्यामुळे माझ्या विठोबाच्या सल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नाका ।।2।।

तुकोबा म्हणतात, की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी साधने आम्हाला चालानार नाही ।।3।।

३१७येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन

गाथा अभंग ३१७

येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥

वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥

येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥

तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥३॥

अर्थ :- पृथवितलावरील क्षणभंगुर अलंकाराणे केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे ।।1।।

खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो, तेथे शास्वत सुखाचा भांडार मिलते ।।ध्रु।।

इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी तुम्हाला त्याचा मोहत पाडत नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, वैकुंठाचा मार्ग चालविनारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत ।।3।।