रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१२८तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या

हुंबरी - अभंग १

गाथा अभंग१२८

तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥

सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥१॥

चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥

अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥३॥

रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥४॥

जाणो तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥५॥

याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥६॥

अर्थ :- तुझ्याशि हुंबरि(तोंडाने गुरगुर आवाज करने) कोण खेळतो? चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराने हां खेल खेळताना सारे दमुन् गेले ।।1।।

भगवंता, सहस्त्रमुखे असलेले शेष. पण तोहि वर्णन करताना थकुन गेला ।।ध्रु।।

चेंडूसह दोहात बड़ी मारलिस आणि दोहात बड़ी घेऊन कालियाला पराभूत केलेस ।।2।।

अशुद्ध, मलिन रक्त पितानि तुला दया आली नाही. पूतना मावशीचे रक्त पिउन तुला थार मारलेस, हे आम्हाला ठाउक आहे ।।4।।

तू स्वत: मामा कंस याला मारलेस, तेहि आम्हाला ठाऊक आहे ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, सारंगधर माझा स्वामी आहे. त्याच्याशी संघर्ष केला तर प्रपंच्यात हानि होते ।।6।।

१२७लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा

लखोटा - अभंग १

गाथा अभंग १२७

लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥

हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥२॥

अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥३॥

बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥४॥

पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥५॥

आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥६॥

नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥७॥

सामाधिअवस्थपर्यंत पोहचलेली एक स्त्री आपल्या प्रपंच्यसक्त मैट्रिनीला म्हणते, मुबंधनाच्या जाएगी मी कसोटा घातला आहे. भावाचे सहाय आहे. आता माझ्याकडे बघ. हा (लाखेने चिटकाविलेले एकीकरण झालेला) लाखोटा मी घेतला आहे ।।1।।

यमनियं इत्यादि अंगाचा अभ्यास करता करता सहजच अगदी हतोहात माझी रुत्ति हरिच्या ठिकाणी गुंतलि, जीवपनाला ती वृत्ति मुकली, माझे हे धाडस चांगलेच आहे. तेव्हा हे सखी,  क्रियेविण असलेला तुझा हां वाचाळपणा सोडून दे ।।ध्रु।।

मझ्यासारखा तुही हरिनामाचा अंगीकार कर. जन्ममरणाच्या फेऱ्यात उगीच पडू नकोस. अंग भदखोर, नीर्ल्लज बाई, थोड़ितरि लाज बाळाग ।।2।।

नावर्याला सोडून दे आणि  भक्तिभाव मनात बाळगुण, भगवंताच्या मोह बाळग ।।3।।

अगं पुरी, बड़बड़ बंद कर. पाठमोरी हो. तू ऊगीचच पंगलि आहेस, पहा , नाहीतर तुला पुढे अवकला प्राप्त होईल ।।4।।

तू आहे एथेच् उभी रहा; उभय उभय देवाला पहा. डुक्कर, गाढव, कुत्री अश पुढे जन्म घेऊ नकोस ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, अगं सखी, मी कसे नामामुळे कल्याण करूँ घेतले. इतर मूली लग्नकरुन , प्रपंच्यामुळे पराधीन झाल्या ।।6।।

१२६फुगडी फू सवती माझे तूं

फुगड्या अभंग 2

गाथा अभंग १५१

फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥१॥

फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥

हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥

सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥

सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥

तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥

अर्थ :- सखे - फुगड़ी - फु मला विरोध करणारी तू, माझी सवत आहेस; कारण तुला प्रपंच्याची आवड आहे. विक्षेप, आवरण या मलाने तुझे डुंगन भरले आहे, टी धूउन टाक; नाहीतर तुझ्या तोंडावर थू:! ।।1।।

माझ्याशी फुगड़ी खेळतानि तुला हार खावि लागली, म्हणून जगाशि संबंध ठेवनारि स्रीये, येथून उठून जा ।।ध्रु।।

प्रपंच्याची फुगड़ी खेळशील तर म्हातारपनि तुझे हात पाय थकतिल. तय प्रपंच्यात मनरूपी नलिन ढुंगन घोलत बसशील आणि तुझ्या ढुंगानाला कामक्रोधाची माती लागेल ।।2।।

हे पोरी, अंग, पंचयप्राण, पंचज्ञानेंद्रीय, मन, बूद्धि या पाच सातांना जिंकल्याशिवाय तू मझ्याबरोबर परमार्थाच्या फुगड़ित कसा टिकाव धरणार आहे ? ।।3।।

प्रपंच्याची फुगड़ी खेळतांना तुझा दम संपला आहे. पाय लुळ-पांगले झाले आहे. तुझी ही अशी वाइट अवस्ता झाली आहे. हे मलिन मनरूपी ढुंगन पुन्ह: पुन्हा का  घोळत बसला आहेस. ? ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, ए गधड़े, अंग, अतातरि संगीतल्या प्रमाणे कर. जागी हो ! ।।5।।

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

१२५ फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी

फुगड्या - अभंग २

अभंग १५०

फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥

फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥

मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥

त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥

आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥

तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥

अर्थ :- संसाराची फुगड़ी खेलतांना (प्रपंचिक क्रिया) मोकळी, मुक्त रहा. सर्व लाज सोडून एकांतत एकालाच पहा ।।1।।

अगं, सर्व संसाराची फुगड़ी 'फु' करून मोडून टाक. तू जर संसार तुडुन टाकला तर खेळात खरी गोडी आहे ।।ध्रु।।

मातेच्या पोटात असताना जे काही शिकलिस, ते आठव, त्यचा उच्चार कर ।।2।।

तुझ्या पाठीवर त्रिगुणवृत्तिचि वेणी उड़त आहे. तिला सावरुं धर. मुलबंधाजवळ तिची गाठ बांध ।।3।।

पुढे पायल टाकत एक- एक भूमिका जीनकुं घे, म्हणजे तेथे तुला मान मिळेल. तिन्ही लिकांत तुला माण मिळेल. ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या-माझ्यात एकच भाव आहे, अशा सम स्तितिमध्ये आपण उच्य पोहचु ।।5।।

१२४या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा

गौळण अभंग १२४

या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥

वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥

उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥

निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥

कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥४॥

एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥

अर्थ :- बायानो, या. आपण सारयाजनी जाऊ आणि वृंदावनी काल्याचा सोहळा पाहू ।।1।।

भगवान् श्रीकृष्ण बासरी वाजवित आहे. त्या वेणुनादामुळे जाण्यासाठी मन आतुर झाले आहे. हा विलंब माला सहन होत नाही ।।ध्रु।।

संसारातील काम राहीले असतील तर राहुद्यात. त्यात अडकून राहु नाका; कारण मानवी औयुषातील श्रीकृष्णभेटीची हीच वेळ आहे, मला याची खत्री आहे ।।2।।

भगवान् श्रीकृष्णचे रूप बघुन डोळे निवतील. घरची अडचणी आननारे कामे तशीच सोसु ।।3।।

कृष्णभेटिच्या आड़ आलेले काहीही, कोणीही मला सहन होत नाही. लोक मर्यादा पालावि हे जरी खरे असले, तरि मला ते मान्य नाही. संसाराविषयी माझे नम उदास झाले आहे. त्याला काय करावे ? ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, गोपिका एकमेकिंना वृंदावानात येण्यासाठी सूचना देत जात आहेत; कारण भगवंतने आपल्या सुंदर, सुकुमार रूपाने त्यांना तद्रूप करुण टाकले आहे ।।5।।.

१२३यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी

काल आणि खेळ अभंग १२३

यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी ।

अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥

म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें ।

खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥

एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे ।

म्हणती गोड जालें । म्हणती गोड जालें । आणिक देई । नाहीं पोट धालें ॥२॥

हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।

देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥

म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या ।

अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥

एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां ।

येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥

आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ।

वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥

करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ।

एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥

नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी ।

म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥

गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें ।

देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥९॥

म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ।

सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥१०॥

आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ।

म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥

धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें ।

मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥

तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें ।

तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥

तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ।

आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥१४॥

अर्थ :- यमुनातिरि उभे राहून श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाले, तुम्ही सारेजन आपापल्या शिदोर्या घेऊन या. आज आपण काला करू. सर्व शिदोर्या एकत्र करू मी प्रथम त्याचा स्वाद घेतो. नंतर मझ्याकादिल शिदोरि त्यात घालतो व तुम्हाला वाटतो ।।1।।

बारे झाले, बारे झाले, अश सारे सवंगडि म्हणतात, ते सारेजन आनंदाने मोहरी, पावे वाजउ लागले, सर्वाणि आनंदाने खड़कावर आपली शिदोरि सोडली.सर्व एकत्र केलि. त्याचा काला करून तो श्रीकृष्ण सर्वाना देऊ लागला ।।ध्रु।।

सरे जन एकपुढे एक, आपले तोड़, हात। पसृ लागले. काल्याचे कवळ मिळाले की सुखी झाले. काल्याचा तो गोळा अधिकाधिक मिलावा असे त्यांना वाटू लागले. 'खुप गोड लागते. गोड वाटते', असे श्रीकृष्णला महान7 लागले 'आमचे पोट भरले नाही', 'आणखी दे', असे म्हणू लागले ।।2।।

भगवंताने अपाला हात मुखाजवळ नेला इतरांना आशा वाटू लागली व ते तोड़ वासु लागले. तो स्वतः खाउ लागला. इतरांना वाकुल्या दाखउ लागला, त्यांनी त्याला धरले ।।3।।

अरे, कान्हा लबाड़ आहे. घासासाठी आपल्या र्ानाट फिरतो. त्याच्या पाठीमागे तो शहाना डूम करतो. माझी माय असलेला कृष्ण सर्वांचे घास खातो. आकाशातील देवहि हाय हाय करू लागले व म्हणाले, आम्ही या सुखाला अंतरलो ।।4।।

गोपाळ एकमेकांच्या ढुंगनावर, पाठीवर, तोंडावर गोळे मारू लागले. ते छरीला सहन होईना. आता पुरझाले. आपण आता चांगले खेल खेळू, ऎसे तो सांगू लागला ।।5।।

सर्वांनी मोठ्या आनंदाने हरीला मधी घेतले व फेर धरला. काहीजण स्वतःभवती फिरु लागले. काही शिंग, बासरी वाजउ लागल. वाकडे, बोबडे, मुके, लुळ, खुजे सवंगडि होते; परंतु ते अत्यंत भाविक होते. ते कान्होबाचे लहुप आवडते होते ।।6।।

श्रीकृष्ण त्या सार्यांचे गोपजनांचे मनापासून कौतुक करात असे. त्यांचे मुख पाहुन छरीला खुप आनंद हॉट असे. निर्मल, प्रांजल भावनेने तो खदखदा हसत असे. एकमेकांचे उष्टे खान्यास त्यांना कधी कंटाळा येत नसे. जे कोणी लाजरे-बजरे होते. त्यांना हरिन आपल्या संगतिति धीट केले ।।7।।

ज्यांची भूक भागत नव्हती, त्यांना त्यांचे तोड़ उघडून भरविले. सर्वाना सारखे सुख दिले. गोपाळ म्हणाले, 'हे हरी, भला रे भला. तुझी सांगत खर्च खुप चांगली आहे रे! तू टोलवाटोलावि केलीस तरी आम्ही इतर कुनासोबत जाणार नाही ।।8।।

गाई वैरण खान्याच् विसरून गेल्या . पक्षी, पशु यांची तीच गत झाली, यमुना नधि वाहान्याची थांबली. मुखात लाळ घोटवित देव हे सारे पाहत होते. गोपाळ धन्य आहे, आमचा धिक्कार असो ! ।।9।।

आता कसे करावे, कसे करावे याचा विचार ते करू लागले. यमुनेतिल मासे होऊन त्यांचे उष्टे सेवन करण्यास जावे, देवांच्या समुदायाने यमुनेचे तट भरून गेले. गोपाल आपले होट पटपत वाजउ लागले ।।10।।

गोपीनाथ आपल्या सावंगड्यांबरोबर क्रीड़ा करात होता. त्याने दीवाना पाहिले. तो गोपाळांना म्हणाला, तुम्ही एमुनातिरि आपले हात धुवू नका, ते म्हणाले, 'हां कान्होबा सगल्यांच्या मनातले ओलखतो. कृष्णच्या उच्छीष्टाचि थोरवि जाणून, त्याचे हाव धरून ते येथे कशे प्राप्त होईल ? ।।11।।

गोपाल म्हणाले आजचा दिवस खरोखर धंन्य आहे. आज भगवंत दिसला. आम्ही सर्व तुझ्या हाटचा काला खाऊन तृप् झालो. एकमेलांच्या प्रेमामुळे सर्व संतृष्ट झाले. त्याच्या पंगतित पोटभर दखी खाल्ले ।।12।।

भगवंता, तुझी मैत्री चांगली आहे. आम्हाला ती नित्य लाभों. आमच्या जीवाला नेहमी असाच आनंद देत जावा. त्यावर कृष्ण म्हणाला. ''अरे, आता आपल्या काठ्या-कांबळी घ्या, हसत खेळत आपण गाई चारायला घेऊन जाउ ।।13।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व प्रेमाने समाधान पावले होते. क9नालाही पुढे चलवेना. हरिन गाई- गोपाळांना आपल्यासारखे केले. आजचा हां आनंद म्हणजे ब्रम्हानंद आहे. त्याचे वर्णन करता येत नाही. परमानंद जातीने आपमच्याबरोबर स्वतःच जातीने हजर आहे ।।14।।

१२२काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या

काला आणि खेळ अभंग१२२

काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या ॥१॥

देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ध्रु.॥

आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥२॥

भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥

मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥

एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥

अर्थ :-  आपापले काम अतोपुन सर्व गोपाळ एका ठिकानी जमले. आता जेवनाची वेळ झाली. आपल्या शिदोर्या आना ।।1।।

सर्वांनी आपापल्या पनपुण्याचा हिशोब त्याच्याजवाल दिला इंद्रियरूपि गाईना अंत:करनिरूपि गोठ्यात बसविले. हरिच्या सोबत दोंदिल, बोबङा, वाकदया, पेंद्द्या, वड़ज्या या नावाचे गोपाळ होते ।।ध्रु।।

आपल्या आवडिप्रमाने त्यांनी पंगतित मुद्रा बांदल्या. हरिन आपली आवडती शिदोरि खोलुन त्यात स्वतचि गोड़ी मिळवली  ।।2।।

पाप-पुन्यात्मक शिदोरिचा भार त्यांनी शुद्ध भावभक्तिसमुदायाचा योग आला नव्हता तो पर्यन्त आपल्या माथि वागविला. परमार्थ लक्षणाचा योग सगळ्यांच्या ठिकाणी आला पाहुन श्रीहरींनी सर्वांच्या पाप-पुण्याची शिदोर्यांची ओझि उतरविलि ।।3।।

जो घाइने, उताविलापनाने मागतो, त्याच्यावर बाकीचे सवंगदि रागवतत व् त्याला म्हणतात, मला मिळेल की नाही'? अशी खोटी भावना मनात का ठेवतोस ? ।।4।।

त्यांचा एकमेकांशी जो सौवाद झाला, त्याने ते गोपाळ ब्रम्हनंदात तृप् झाले. तुकोबा म्हणतात, ते गोपाळ म्हणू लागले, या रे या, आपण सारेजन श्रीहरिच्या चरणांना वंदन करुया ।।5।।