सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३०८अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव

गाथा अभंग ३०८

अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥

नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥

जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥

तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥

अर्थ :- सर्व चराचर सृष्टिमध्ये परमेस्वर भरून राहिला आहे, म्हणजे तो पाषाणाच्या धातुच्या मूर्तिमध्ये असनाराच ना! ।।1।।

पाखंड किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग ? ।।ध्रु।।

संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती नास्तिकांच्या मनी नसल्यामुळे त्याना सांत्वचनाचे महत्त्व कळणार नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, संत सगुणभक्तिचा अनुभव नास्तिकाणां नसल्यामुळे ते सगुन भक्तिचा निषेध करतात ।।3।।

३०७अरे हें देह व्यर्थ जावें

गाथा अभंग ३०७

अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥

मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥

विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥

अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥

तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥

अर्थ :- हां नरदेह वाया जावा असे तुला वाटेत असेल तर तू खुशाल सारिपाट खेळत रहा ।।1।।

मग हरिचे नाम तुझ्या मुखी येणार नाही, तू अज्ञानाच्या निद्रित असल्यामुळे राम तुला भेटनार नाही, त्यामुळे तुला जन्मों जन्मीचे दुःख भोगावि लागेल ।।ध्रु।।

प्रपंच्यातील विषयसुखाची लंपटता, परस्त्री आसक्ति या सर्व अधोगतिला जाणाऱ्या वाटा आहेत ।।2।।

नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखी एक मार्ग आहे ।।3।।

तुकोबा म्हणतात, नारादेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लाउन घे, नाहीतर नाराजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील ।।4।।

३०६धिग जीणें तो बाइले आधीन

गाथा अभंग ३०६

धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥

धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥

धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥

धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥

तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥

अर्थ :- जो गृहस्त पत्नीच्या अहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात, त्याला इहलोक व परलोकि मान मिळत नाही ।।1।।

जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करात असतो, त्याचा हातून अतिथी- पूजा घडत नहीं, त्या मनुष्याचाहि धीक्कार असो ।।ध्रु।।

ज्याला आळस,निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषयाचाहि धिक्कार असो ।।2।।

जो मनुष्य विवेक आणि वैराग्याविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाहि दिक्कार असो ।।3।।

तुकोबा म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालनाराहि अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो  ।।4।।

तुकोबा म्हणतात,

३०४बोलविसी तैसें आणीं अनुभवा

गाथा अभंग ३०४

बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥

मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥

संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥

कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥

तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥

अर्थ :- हे विठ्ठला, तू जसे मला बोलविन्यास शिकवितोस, अनुभव देतोस, तसे मझ्याकडून लिहिले जावे; नाहीतर जगात माझी फजीती होईल ।।1।।

मिठाशिवाय मिष्टान्नाला चाव येत नाही किंवा ज्या शरीरात प्राण नाही, त्याला शृंगार करुण उपयोग नाही ।।ध्रु।।

एखादे सांग वठविन्यासाठी रूप व गुण यांची आवशकता भासते ।।2।।

थाटामातात केलेल्या विवाहसमारंभाला नावरानावरिशिवाय शोभा नाही ।।3।।

तुकोबा महानता, भावाविन भक्ति ही वरील सर्व उदाहराणप्रमाने व्यर्थ आहे ।।4।।

३०३छळी विष्णुदासा कोणी

गाथा अभंग ३०३

छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥

येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥

नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥

तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥

अर्थ :- विंष्णु दासांना जे कुणी अप शब्दात बोलता त्यांची वाणी ही अपवित्र असते म्हणून अश्याणाच ते सुचते ।।1।।

अश्या लोकांना जवळही फिरकु न द्यावे असे लोक अपवित्र असतात ।।ध्रु।।

त्यावर मातृत्वाची शिकवण चांगली झाली नसावी त्यामुळे त्याला हरिकथा आवड नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, अस वागल्याने त्याची मति तो त्याच्याच हाताने भृष्ट करतो आहे ।।3।।

३०२आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥ अर्थ :- आंधळयाला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगच आंधले भासते ।।1।। आजारी माणसाला तोंडालाचव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते ।।2।। तुकोबा म्हणतात, ज्याचे चित्त शुद्ध नाही, त्याला सारे त्रभुवन खोटे भासते ।।3।।

गाथा अभंग ३०२

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥

रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥

तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥

अर्थ :- आंधळयाला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगच आंधले भासते ।।1।।

आजारी माणसाला तोंडालाचव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते ।।2।।

तुकोबा म्हणतात, ज्याचे चित्त शुद्ध नाही, त्याला सारे त्रभुवन खोटे भासते ।।3।।

३०१माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज

गाथा अभंग ३०१

माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥

कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥

अर्थ :- एखादी गोष्ट 'माझी' आहे, ऎसे म्हणताना तुला लाज कशी रे वाटत नाही ? कन्या, पुत्र, धन संप्पत्ति सारे माझे आहे, असे म्हणणे म्हणजे वेडेपना नाही काय ? ।।1।।

सारे नातेवाईक किंवा धन- संपत्ति आपल्याला कालपुरुषयाच्या तावडीतून सोडवू शकत नाही. भगवंत हाच फक्त खरा आहे. बाकी काही खरे नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, या चांडालाना किती वेळा सांगावे, की असे जीवन का घालविता? ।।3।।