सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३००मृगजळा काय करावा उतार

गाथा अभंग ३००

मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥

खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥

मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥

स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥

सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥

अर्थ :- मृगजलाची नधि पार करण्यासाठी पायउतारा व्हावे लगत नाही ।।1।।

खपरच्या खोट्या पैश्याने मुले खळतात , त्यात खरोखरचा आर्थिक लाभ हानी नासते ।।ध्रु।।

लहान मूली बाहुला-बाहुलीचे लग्न करतात; पण त्यात खरे नाथे जोडले जात नाहीत ।।2।।

स्वप्नातील सुखदुःखाशी जागृतिमधील जीवनातील काहीही संमंध नसतो ।।3।।

खेळाच्या पतावरि सोंगत्या मरतात, जगतात हे सर्व जसे खोटे असते, तसेच बध्दता, मुक्तता हे शब्द आत्म्याला लागू पडत नाही, असे तुकोबा म्हणतात ।।4।।

२९९आमचे गोसावी अयाचितवृत्ती

गाथा अभंग २९९

आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥१॥

दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥

तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥३॥

अर्थ :- काही गोसावी आपली अयाचित (दान घेण्याची) वृत्ती स्वत: न सांगता शिष्याकडून सांगतात ।।1।।

दगडाचि जड़ नाव इतर दगडांना पैलतीरावर नेउ शकणार नाही; कारण ती स्वतः पाण्यात तरंगत नाही ।।2।।

तुकाराम महाफज म्हणतात, साधुचा वेश परिधान करण्याचे सोंग करुण त्यांनी साधुत्व विटंबिले आहे ।।3।।

२९८साधूनी बचनाग खाती तोळा तोळा ।

गाथा अभंग २९८

साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥१॥

साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥

असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥

अर्थ :- कही लोक सरावपूर्वक सर्पविष खान्याची कला करतात, पण इतरांना ते पाहावात नाही ।।1।।

काही लोक सर्प पकदन्याची जाणून हातात सर्प पकड़तात, इतर लोक मात्र ते पाहुन भयान कापतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, जगात जे अशक्य आहे ते प्रयत्नपूर्वक साध्य करणारे लोक असतात ।।3।।

२९७कोणें तुझा सांग केला अंगीकार

गाथा अभंग २९७

कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥१॥

कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥

तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥

कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥३॥

तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥

अर्थ :- तुझा कोणी अंगीकार केला की, तू त्याला थोर मानतो ।।1।।

विठ्ठालाला शरण जावु नको, म्हणून तुला कोणी उपदेश केला आहे का ? ।।ध्रु।।

जेव्हा यम समोर येईल तेव्हा तुला कोण पाठीशी घालेल ।।2।।

काळ क्षणाक्षणाने तुझे आयुष्य खात आहे; त्यामुळे तुझे बळ दिवसेंदिवस कमी होत आहे ।।3।।

तुकोबा म्हणतात, आशा नास्तिकाला कोणीतरी परमेस्वराची अठावन करुण दया ; कारण तो त्यालाच विसरला आहे ।।4।।

२९६ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं

गाथा अभंग २९६

ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥

थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥

पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥

न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥

अर्थ :- भगवंताच्या महिमा ऐसा आहे, की तो भिल्लिनिचि उस्टि बोरे आवाडीने खातो ।।1।।

त्याला प्रेमाचा दुष्काळ भासतो, तो भक्तांच्या प्रेमाचा भुकेला असतो ।।ध्रु।।

सुडाम्याचे कोरडेच पोहे फकी मरून चवीने खातो ।।2।।

तुकोबा म्हणतात, भक्ताने उष्टे आणले आहे, की थोड़ेसेच आणले आहे, हे तो पाहत नाही; तर त्याचा भक्तिभाव पाहतो ।।3।।

२९४प्रारब्ध क्रियमाण

गाथा अभंग २९४

प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥१॥

अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥

सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ॥२॥

खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥३॥

देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥४॥

अर्थ :-  भक्तानां नशीब, कर्म आणि पाप्पुन्याचा साठा भोगवा लगत नाही ।।1।।

करम तो भक्त अंतर्बाह्य भगवंताशि एकरूप झालेला असतो ।।ध्रु।।

हरिभक्तांना सत्त्व-रज-तमाची बाधा होत नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, की देव आणि भक्त एकरूप झालेले असतात ।।3।।

२९५शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति

गाथा अभंग २९५

शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥

म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥

सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥

तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥३॥

अर्थ :- जो सहा सास्रांचे सार आणि वेदांची साक्षात मूर्ति आहे, तो आमचा सांगाती, प्राण सखा आहे ।।1।।

म्हणून आम्हाला इतरांची पर्वा नाही; कारण नामस्मरनाने आमचे सर्व चांगले झाले आहे ।।ध्रु।।

राज्य रूप सगुन-निर्गुण आहे, तो आम्हा (भक्त) बरोबर नेहमी क्रीड़ा करतो ।।2।।

तुकोबा महानता, आम्ही (भक्त) जन्मदात्यांचे जन्मदाते आहोत, स्वयंभू आहोत ।।3।।