रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१३५शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी

आडसण दळण - अभंग १

गाथा अभंग १३५

शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥

आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥

सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥

सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥

सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥

दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥

सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥

अर्थ :- एका स्त्री ने परमार्थाचे शुद्ध दळन बाजूला ठेऊन मन_बुद्धिरूपी जात्याची पाळी विषयांना  भरून टाकली व ते विषय भरडुन परमार्थ नष्ट केला ।।1।।

हे पाहुन एक सुआहानि बाई तिला म्हणते, हे सखे, अंग, दळण निवाडायच, पाखडायचं असत. हे पापिनी, सिद्ध वस्तुंचा नाश तू का केलास ? ।।ध्रु।।

जो पर्यन्त तुझ्या हातात नरदेहाचे सुप आहे, तो पर्यन्त विचार कर. जसे दळन दळले जाईल, तसे खायला मिळेल . पंचक्रोशाचे फहोलपत वेगळे झाले नसता शुद्ध पर्मार्थाचा नाश का मकेलास ? ।।2।।

पुन्यात्मक कर्माचे दळन द्ळलेस तर सुखाचे जेवण मिळेल ।।3।।

परदेहाचे सुप जवळ असतांना संतसंगति कर. पर्मार्थाचा एकदम नाश का बारे केलास? ।।4।।

जोपर्यंत नारदेहाच सुप तुझ्या जवळ आहे, तोपर्यंत विचारपूर्वक अडसर (पाखड़ने) कर, नाहीतर नाश होईल ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत (नारादेहरूपि) सुपात तुझा वास आहे, तोपर्यंत पर्मार्थाचे प्रयत्न कर; नाहीतर तू जन्ममृतुच्या सान्दी-कोपर्यात अडकून पदशील ।।6।।.

१३४सावडीं कांडण ओवी नारायण

कांडण अभंग 02

गाथा अभंग१३४

सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥

मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥

वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥

कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥

तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥४॥

अर्थ :- नारायणा, ओवी गात कांडन करा. त्यातले आत्मारूपी भुस आणि आत्मारूपी सार यांची स्वतः निवड करा ।।1।।

विवेकाचे मूसल घट्ट धरून, मन बुद्धि स्तिर ठेऊन वैराग्याचे सारखे घाव घाला ।।ध्रु।।

अनाहत नावाचे कंकण वाजत आहेत. त्या नादात गाने गात बाहर जाऊ ।।2।।

'तुझे माझे' हां भाव बाज7ला राहील तो पर्यंत कांडत असताना थाकायला होणार नाही ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, जसे आरश्यात आपले रूप प्रकट होते, तशी या कांडनासोबत पाकसिद्धि झाली ।।4।।

१३३सिद्ध करूनियां ठेविलें कांडण

कांडण - अभंग २

कांडण - अभंग 1

गाथा अभंग१३३

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥

आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥

एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥

सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥

उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥

तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥

अर्थ :- हे कांडन मी सिद्ध करून ठेवले आहे. कांडायला मदत करणारी निष्काम कर्म-भक्ती यांचे संस्कार असलेली सीध बुद्धि, तय बुद्धिला मि अगिदरच सांगून ठेवले आहे, की ।।1।।

तू मागील प्रहार स्मरणात ठेव आणि शेवटच्या प्रहरात जागे कर ।।ध्रु।।

हे साजणी, कांडत असताना समतव्हाचा एक घाव घायल म्हणजे तुला माझी प्राप्ति होईल ।।2।।

स्थूलदेह पाखडून त्याला आत्मयापासून दूर कर. नंतर लिगदेहाला निवड त्यानंतर कारण देहाला मात्र 'मी ब्रम्ह आहे' ऐशी वृत्ति देखील शिल्लक न ठेवता चांगले सडून काढ़ ।।3।।

सखे, कांडन संपल आहे. आता ब्रम्ह रसाचा स्वयंपाक कर. त्यात प्रेमरूपी दूध आणि भक्तीरूपी साखर घालून पक्कन्ने तयार कर ।।4।।

उद्धव आणि अक्रूर हे दोघे भाऊ जेवायला येणार आहेत. बाप नारायण त्यांच्या बरोबर आहेच ।।5।।

तुकाराम महाराज म्हणतात, मला माहेरचि फार आवड आहे, म्हणून त्याना तातडीने आमंत्रण पाठविले ।।6।।

१३२आम्हां घरीं एक गाय दुभता हे

गाई - अभंग १

गाथा अभंग१३२

आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥

वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥

वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥

चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥

तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥

अर्थ :- आमच्या घरी एक गाय, आहे व ती दूध देते. तिने पाणा सोडलाकि त्या दुधाने त्रिभुवन भरून जाते; त्रिभुवनातहि ते मावत नाही ।।1।।

अशी ती गाय सावळ्या रंगाची असून तिचे नाव श्रीधरा असे आहे. पृथ्वी सह चौदा भुवनांत ती चरत असते ।।ध्रु।।

तिला एकहि वासरु नाही. ती कोनाबरोबरही जाते. भावपूर्वतेने जो कुणी तिला कुरवाळेल. त्याला ती पोटभर दूध देते ।।2।।

चारही सडांतून धारा सोडून अमाप दूध देते. ते दूध पिउन ऋषि मुनि तृप्त झाले आहेत ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही गाय त्रैलोक्यल तृप् करू शकते . त्यापुढे माझी भूक ती कितिशी अशनार? ।।4।।

१३१सिद्ध करूनियां ठेविलें कांडण

कांडण - अभंग २

कांडण - अभंग 1

गाथा अभंग१३१

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥

आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥

एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥

सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥

उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥

तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥

अर्थ :- हे कांडन मी सिद्ध करून ठेवले आहे. कांडायला मदत करणारी निष्काम कर्म-भक्ती यांचे संस्कार असलेली सीध बुद्धि, तय बुद्धिला मि अगिदरच सांगून ठेवले आहे, की ।।1।।

तू मागील प्रहार स्मरणात ठेव आणि शेवटच्या प्रहरात जागे कर ।।ध्रु।।

हे साजणी, कांडत असताना समतव्हाचा एक घाव घायल म्हणजे तुला माझी प्राप्ति होईल ।।2।।

स्थूलदेह पाखडून त्याला आत्मयापासून दूर कर. नंतर लिगदेहाला निवड त्यानंतर कारण देहाला मात्र 'मी ब्रम्ह आहे' ऐशी वृत्ति देखील शिल्लक न ठेवता चांगले सडून काढ़ ।।3।।

सखे, कांडन संपल आहे. आता ब्रम्ह रसाचा स्वयंपाक कर. त्यात प्रेमरूपी दूध भक्ती

१३०हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍याशीची

हमामा अभंग 2
गाथा अभंग १३०

हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्‍याशीची ॥१॥

पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥

दुसर्‍या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥२॥

तिसर्‍या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥३॥

चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्‍यापा टिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाईं ॥४॥

हमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक । विठोबा त्यासवें चारितो गाई ॥५॥

अर्थ :- पोरा, हमामा रे हमामा. हमामा खेळतांनी जर तू फसलास तर चौरयांशी लक्ष योन्यांची एरझार तू करीत राहशील ।।1।।

गर्भावस्थेचा पहिल्या प्रहरात रंगातयेउन  'सो..हं 'सो..हं चा छंद घेतलास, नंतर संसारातले गाड़ी दिसले तेव्हा सो..हं विसरलास आणि स्वत्: होऊन त्या दावात पड़लास ।।ध्रु।।

बालपनाच्या दुसऱ्या प्रहरात महानंद छद घेऊन तू हामामा घालू लागलास. दिवस जाट होते तस तसे गोड वाटत होते; पण पुढे काय होणार,  हे कळत। नव्हते ।।2।।

तारुण्याच्या तिसऱ्या प्रहरात अहंपनात छद लागला व् त्यामुळे एकठिकानि पाय स्तिर राहिना. प्रपंच्याचा हव्यस करता करता दावत पडशील, हे मात्र नक्की समज ।।3।।

म्हातारपनाच्या चौत्या प्रहरात हमामा करतांना हात पाय लटपाटू लागले. सूर्यदेव पाटलाचा यम हां पोरगा आहे. त्याच्या डावाट पडशील रे बाबा! ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, हा हामामा घालतानि भीउन मी फया गड़याची संगत सोडली. आणि यादवाचे पोर विठ्ठल, याच्या संगतिने गाई चारु लागलो ।।5।।

१२९मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार

हमामा - अभंग २

गाथा अभंग १२९

मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥

पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥

मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥

तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥

मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥

मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥

आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥

तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥

अर्थ :- पोरा,माझ्याशी एकदा हमामा ( विशिष्ट प्रकारचा खेळ ) खेळ म्हणजे तुझे खालचे अधोगतीचे दार मिटऊंन टाकिन ।।1।।

ए पोरा, अरे हमामा-हमामा खेळ ।।ध्रु।।

माझ्याशी हमामा खेळताना तू खाली-वर सांभाळ ।।2।।

पोरा, अरे, तुझ्या आत जिव्हाळ्याचा ओलावा असेल, तरच माझ्याशी बोल ।।3।।

माझ्याशी बोलताना तुझ्या मी- तुपनाचा नाश होईल ।।4।।

तू मझायाबरोबर आहेस खरा, पण तुला प्रपंच्याकडे फिरु देणार नाही ।।5।।

आमच्या रंगाच्या संगतित दुसरा कुणी टिकट नाही ।।6।। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याशी भाषण केले तर मी जीवाचे हैरान करतो व त्याचा नाश करतो ।।7।।